मंगलवार, 11 नवंबर 2008

व.पु.काळे....

'काहीही वाईट घडलं की काहीतरी स्वतःचं जळतय एवढी जीवनाबद्दल ओढ हवी॥स्वतःच्या दुखांबद्दल आपलं भांड नेहमीच मोठ ठेवावं आणि दुसा-यांबद्दल भांड एवढं लहान असावं की एका अश्रूनेही ओसंडून जाईल।स्वतःच्या यातनामय आयुष्यक्रमाची आणि भावनात्मक ताणतणावाची तितक्याच लहरींवर दुसा-या कुणाला तरी जाणीव आहे आणि ती व्यक्ती ही तेवढीच बेचैन आहे, एवढ्याच आधाराची संवेदनक्षम व्यक्तीला गरज असते.आपण हा जो जन्म घेतला आहे तो अपेक्षपूर्तिंसाठी नाही. आपल्या दुस-यांकडूनच अपेक्षा असतात असे नाही, आपल्या स्वतः कडुनहि अपेक्षा असतात. त्या पूर्ण होत नाहीत, उरतात फक्त जाळणारया व्यथा.माझ्या मते हा जन्म अपेक्षपुर्तिंसाठी नाहीच, तो आहे परतफेडिसाठी...!!!
व.पु.काळे....