सोमवार, 29 सितंबर 2008

GOA POLICE v/s दाडीवाले

राज्यात आज उत्तर तसाच दक्षिण भागातील महत्वाच्या ठिकाणी बोम्ब स्फोट घड्वीण्यात येणार असल्याच्या निनावी दुराध्वानिमुळे घबराट पसरली पणजी येथील मध्यवर्ती बसस्थानकावर बोम्ब निकामी करणार्या पथाकन कसून तपासणी केलि ( प्रामुक्याने दाडीवाल्यांची) मात्र शेवटी ही अफवा असल्याचा सिद्ध झाल प्रशासनाने मात्र सुरक्षाते बाबत केलेला दावा विफल असल्याच
या घट्नेन सिद्ध झालय
गोव्यात गेल्या दोन वर्षा पासून आतंकवादी हल्याचा प्रयत्न होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते याच पश्वभुमिवर राज्यातील सुरक्षा यंत्रणेला सतर्क करण्यात आलय राज्य प्रशासनान या करीता विशेष बोम्ब निकामी करणार्या पथाकाची स्थापनाही केलि मात्र त्याच्याकडे असलेली अपुरी साधन सामुग्री सरकारच्या अनास्थेय्ची साक्ष देत होती


आणि म्हणुनच कदाचित ह्यावर पांघरून ओढ़णयासाठी दाडीवाल्याना टारगेट केल जात होत बोम्ब स्कॉड नेमक समोरून येणार्या किवा बसेल्याँ पैकी फक्त दाडीवाल्यांची तपासणी करत होते । तपास काम जरुर करा कुणाही अडवत नाहि मात्र बोम्ब स्कोड ने तिथेच बाजूला नन्स जवळ असलेल्या पार्सल ची तपासणी का केलि नाही?.चर्च च पार्सल आहे म्हणताच बोम्ब स्कॉड तिथून निघून गेलेत .मान्य आहे की आता पर्यन्त झालेल्या बोम्ब सोफ्टा मागे मुस्लामानाच आहेत पण जर का उद्या हेच दहशदवादी जर दाडी काढून चर्चच्या पादरी सारखे पाढरे किवा दाडी ठेउन भगवे कपड़े घालून आला तर गोवा पुलिस त्याची तपासणी नाहि करणार ?

असो हा झाला पहिला मुद्दा पण सरकारने सुरक्षाते बाबत केल्या घोषणेच काय झाल ? कुठे आहे अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा ? बोम्ब निकामी करणार्या पथकाला घटनेची माहिती मिळून सुद्धा अर्ध तास उशीर कशासाठी ? या पथकाकडे श्वाना व्यतिरिक्त बोम्ब निकामी करणार्या उप्कर्नाची उणीव कश्या मुळे ?

ह्या सग्ल्यामुळे मात्र निरपराध नागरिकांना पोलिसांच्या so-called तपासणीला समोर जाव लागल पण बोम्बच्या अफ्वेने मात्र या पथाकाची जणू रंगित्त तालिमच झाली

रविवार, 28 सितंबर 2008

लता दीदी आणि गोवा








काही व्यक्तिमत्व अशी असतात ज्यांच्या मुळे तो देशच नव्हेतर संपूर्ण विश्वालाच अभिमान वाटावा ...लता मंगेश्कर हे नावही असच, सर्व भारतींयाना या नावाचा सार्थ अभिमान आहे, गेली सहाहुन अधिक दशक आपल्या जादुई आवाजान जगाला भुरळ घातलीय



लता मंगेशकर यांच कुटूंबिय मुळच गोव्यातील मंगेशी गावच आणि या गावाची ओळख म्हणजे प्रसिद्ध देव मंगेशाच ।चारही बाजूने डोंगर हिरवी झाडा आणि त्यातच वसलेले हे सुंदरस गाव या गावाला निसर्गा बरोबरच कलेचाही वरदहस्त लाभालय
पं जीतेन्द्र अभिषेकिही याच गावाचे लता दीदी ने मात्र या गावाला वेगळ वलय मिळवुन दिलेय अत्रेंच्या भाषेत बोलायचा तर पुढील हजार वर्षात या गावाची ओळख लता आणि केवळ लताच राहणार आहे

आज आपण जे देव श्री मंगेशाचा भव्य दिव्य मंदिर पाहतोय याच मंदिराच्या शेजारी मंगेश्कर कुटुंबिय राहत होत आता इथे फुल विक्रित्या महिला बसतात समोरच विशाल असा तलाव आहे आजू बाजुचा निसर्ग जणू या तलावत प्रतिबिंबित झालाय लता दिदिंच्या बलपणाचा हा तलाव साक्षीदार आहे मंदिरात देव दर्शनाला येणार्या भक्ताना धर्मशाळा बंधण्याची जागेची आवश्यकता भासली आणि या करीताच मंगेशकर कुटुंबीयांना येथे जवळच असलेल्या दुसर्या जागेवर स्थलांतर क्र्रण भाग पडल आज दिदंच मुळ घर इथे नसल तरी नातेवाईक राहत असलेले छोटेखानी घर आहे


मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश आशया गणाऽया मंगेश्कर कुटुबीयाच या ठिकाणी वर्षातून एकदातरी येण होत मगेश्कर कुटुम्बिय आज इतक्या उंचीवर येउन पोचलय मंगेशा शिवाय हे शक्य होऊ शकणार नसल्याची प्रचितिही या मुळे येते