आज देश भरात ईद साजरी करण्यात आली इस्लाम धर्मा मधे चंद्र पहिल्या नतर ईद साजरी करण्याची प्रथा आहे हे वेगळ सांगायला नको पण हिंदू धर्मात मात्र विचित्रच आहे म्हणजे चतुर्थीला चाँद पहिला तर चोरीचा आरोप लागतो आणि अस ही म्हणतात की एकदा श्री कृष्णाने चतुर्थी दिवशी नुस्त पाण्यात चंद्राचा प्रतिबिम्ब पहिला तर त्यांच्यावर इंडियन पीनल कोड नुसार धारा ३९२ या सेक्शन खाली त्याच्या वर चोरी केल्याचा आरोप लागला होता पण संकष्टी चतुर्थी दिवशी मात्र हाच चाँद बघून उपवास सोडायचा असतो । गणपति diplomate सारखे वागले का असा प्रश्न पडतो ( कृपया हिंदुत्व वादी संघट्नानी गणपतीला diplomate शब्द वापरल्या बद्दल वाइंट वाटुन घेऊ नये ) कुणालाही जर संकष्टी चर्तुथी दिवशी चंद्र का पाहतात हे माहित असेल तर please कळवा
मी main टोपिक वर येते ...... तर चतुर्थी दिवशी चंद्र पहायचा नसतो ह्यावर अजुनही मनुष्य प्राणी विश्वास ठेवतो त्यात कौस्तुब आणि यदनेश माझे दोन सुशिक्षित मित्र दोघेही पहिल्ल्याच दिवशी आमच्या घरी चतुर्थीला आले होते . गणपतीला नमस्कार केला गप्पा गोष्टी झाल्या आणि प्रसादाच्या नावाने हादडला सुद्धा साधारण अर्धा तास उलटल्या नंतर कौस्तुब बोलला की अमेय च्या घरी जायचा आहे आम्ही निघतो . ह्या नंतर चे आमचे संवाद गेट बाहेर कौस्तुब आणि यदनेश बाइक वर आणि मी गेट्ला चिटकुन उभी आम्ही दोघे म्हणजे कौस्तुब आणि मी बोलत होतो तितक्यात
यदनेश : ( मोठ्याने ओरडला ) oh shit (एक हाताने डोळे झाकले आणि मान खाली वाकवली)
कौस्तुब : ( मागे वलून ) काय रे काय झाल ?
यदनेश :( डोळे झाक्लेलेच आणि मान खाली वाकून वर बोट दाखवत ) वर बघ वर बघ
कौस्तुब : (वर बघत यदनेश च्या स्टाइल ने एका हाताने डोळे झाकले व् मान खाली वाकवली ){तो पर्यन्त मी सुद्धा चन्द्र पहिला } oh shit चुतिया साल्या तू पाहिलास तो पाहिलास मला का सांगितला वर बघायला
कौस्तुब ने बाइक ला रागाने किक मारली दोघे एक मेकाना शिव्या देते गेले ....... तर असा आम्ही चतुर्थी दिवशी पाहिलेला चतुर्थीचा चाँद
गुरुवार, 2 अक्तूबर 2008
सदस्यता लें
संदेश (Atom)