रविवार, 28 सितंबर 2008

लता दीदी आणि गोवा








काही व्यक्तिमत्व अशी असतात ज्यांच्या मुळे तो देशच नव्हेतर संपूर्ण विश्वालाच अभिमान वाटावा ...लता मंगेश्कर हे नावही असच, सर्व भारतींयाना या नावाचा सार्थ अभिमान आहे, गेली सहाहुन अधिक दशक आपल्या जादुई आवाजान जगाला भुरळ घातलीय



लता मंगेशकर यांच कुटूंबिय मुळच गोव्यातील मंगेशी गावच आणि या गावाची ओळख म्हणजे प्रसिद्ध देव मंगेशाच ।चारही बाजूने डोंगर हिरवी झाडा आणि त्यातच वसलेले हे सुंदरस गाव या गावाला निसर्गा बरोबरच कलेचाही वरदहस्त लाभालय
पं जीतेन्द्र अभिषेकिही याच गावाचे लता दीदी ने मात्र या गावाला वेगळ वलय मिळवुन दिलेय अत्रेंच्या भाषेत बोलायचा तर पुढील हजार वर्षात या गावाची ओळख लता आणि केवळ लताच राहणार आहे

आज आपण जे देव श्री मंगेशाचा भव्य दिव्य मंदिर पाहतोय याच मंदिराच्या शेजारी मंगेश्कर कुटुंबिय राहत होत आता इथे फुल विक्रित्या महिला बसतात समोरच विशाल असा तलाव आहे आजू बाजुचा निसर्ग जणू या तलावत प्रतिबिंबित झालाय लता दिदिंच्या बलपणाचा हा तलाव साक्षीदार आहे मंदिरात देव दर्शनाला येणार्या भक्ताना धर्मशाळा बंधण्याची जागेची आवश्यकता भासली आणि या करीताच मंगेशकर कुटुंबीयांना येथे जवळच असलेल्या दुसर्या जागेवर स्थलांतर क्र्रण भाग पडल आज दिदंच मुळ घर इथे नसल तरी नातेवाईक राहत असलेले छोटेखानी घर आहे


मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश आशया गणाऽया मंगेश्कर कुटुबीयाच या ठिकाणी वर्षातून एकदातरी येण होत मगेश्कर कुटुम्बिय आज इतक्या उंचीवर येउन पोचलय मंगेशा शिवाय हे शक्य होऊ शकणार नसल्याची प्रचितिही या मुळे येते

कोई टिप्पणी नहीं: