बुधवार, 31 दिसंबर 2008

ये है मुंबई मेरी जान...

१० वर्षा नंतर मी मुंबई ला जाणार होते गोव्या हून मुंबई ला जाताना उत्सुकता लागुन राहिली होती की आता मुंबई कशी असेल mentally मी बस मधेच स्वताला तयार करत होते आनंद पण होत होता आणि भीती पण होती कारण पहिल्यांदाच मी गोव्याहून मुंबई ला एकटी जाणार होते ।सकाळी ७ च्या दरम्यान बस पनवेल ला पोहचली पनवेल पासून काही अंतरावर मी जे १० वर्षा पूर्वी पहिला होत ते अजुन सुरूच होत ...ओ काय म्हणुन काय ।!!! तेच आपल नेहमीच नैसर्गिक कार्य ।लहान असताना मुंबई ला पोहचलो की नाहि याचा अंदाज मी वासाने घ्यायचे ...तो वासही तसाच होता ... ह पण शिव सेने एवजी मनसे चे होर्डिंग्स बैनर्स आणि जेंडे जास्त दिसली अगदी झोपरपट्टी वर मनसेचा झेंडा फडफडत होता ... जय महाराष्ट्र जय मराठी एकदाची मुंबईत पोहचले आणि भीती थोडी कमी झाली कारण मुंबई तशीच होती ॥मुंबईत अतिरेकी हल्ल्यात मरण पावलेल्याना आदरांजली म्हणुन होर्डिंग्स लावले होते व्यर्थ न हो बलिदान वैगरे वैगरे ..... पण मुंबई मात्र तशीच होती ... अजुन लोकांचा संसार फुटपाथ वर चालत होताआवाज घाई गड़बड़ धावपळ ... मी स्वता पत्रकार असल्यान मला घाई गड़बड़ धावपळ its part of my life त्याच्या फरक मला जाणवत नव्हता पण मी १००% गोमंन्तकिय असल्याने मला धूळीचा आणि आवाजाचा मात्र भरपूर त्रास झाला


मुंबई लोकल
लोकल ट्रेन चा प्रवास !तो तर केलाच पाहिजे आणिते सुद्धा ऑफिस ची वेळ संपल्या वर म्हणजेच संध्याकाळी ५ नंतर .....ट्रेन च्या बाहेर असलेल्याला आत आणि आत असलेल्याला बाहेर मुंबई कर सहज फेकतो ...तुम्ही फक्त ट्रेन च्या दरवाज्या समोर उभे रहा आणि नंतर भगवान भरोसे छोड़ो पण हो अश्या वेळी अनेकदा तुमचे चप्पल बाहेर किवा आत राहण्याची दाट शक्यता असते कधी कधी तुमच्या डाव्या खांद्याला परफ्यूम चा तर उजव्या खांद्याला घामाचा वास येतो यात तुमच्या वास कुठे तरी हरवतो अर्थात तो वास आणि कुणाच्या तरी डाव्या किवा उजव्या खांद्याला येत अस्तो आणि हो ट्रेन मधे घुसताना body massage सुद्धा चांगला मिळतो ...एखादा मोब असल्या सारखा मुंबई कर ट्रेन च्या दिशेने धावतात आणि काही कळायच्या आत तिथे उपस्तिथ असलेली नवी व्यक्ति एकतर ट्रेन च्या आत किवा बाहेर तरी असते अनेक वेळा मुंबईकराला एक sation आधीच किवा एक sation पुढे उतराव लगता .....ट्रेन मधे असलेल्या प्रतेक माणसाच्या डोक्यात विचार कायम सुरूच असतात आणि चेहर्यावर नेहमी प्रश्न चिन्ह असतो .......


गर्भपात केन्द्र
होय गर्भपात केन्द्र .... अंधेरी मार्केट मधे हे केन्द्र आहे मोठा निळ्या रंगाचा बोर्ड त्यातसफ़ेद अक्षरात लिहिल होत गर्भपात केन्द्र एका तासात गर्भपात आज पर्यन्त मी दूरदर्शन केन्द्र आकाशवाणी केन्द्र ऐकली होती पण गर्भपात केन्द्र !!! गर्भपातावर कायद्याने बंदी नाहीये याची कल्पना आहे पण एक अशी जागा जिथे फक्त हत्या केलि जाते त्याला केन्द्र कसा काय म्हणुन शकतो ? त्या पेक्षा कत्तलखाना शब्द योग्य नव्हता का ? ख़ुद काटे गले सबके कहे इसको bussiness इन्सा का नही कही नामो निशा जरा हटके जरा बचके ये है मुंबई मेरी जान ....
संघर्ष ,जगण,जिद्द ह्या सग्ल्यांचा खरा अर्थ मुंबईत गेल्या नंतर समजल जय हिंद जय महाराष्ट्र जय गोमन्तक

कोई टिप्पणी नहीं: