शनिवार, 26 जुलाई 2008

मलाय भाषा ......पु.ल. देशपांडे


पुर्वरंग सात-आठ दिवसांत मी सिंगापुरात रुळु लागलो होतो। मलाय भाषेतल्या काही शब्दांवर तर माझा फारच लोभ जडला. विद्दाधर चेंबुरकर हा पार्लेकर असल्यामुळे त्याच्या अस्सल भाषाप्रभुत्वाविषयी मला शंका नव्हती. परंतु त्याच्या बायकोने टेलिफोनवरुन कुणाला तरी "साला!" म्हणून रिसिव्हर आपटल्यावर मी मात्र जरासा गडबडलो. पण तिच्याही लक्षात माझी अस्वस्थता आली असावी. "मलाय भाषेत ` रॉंग नंबर' असे टेलिफोनवर म्हणायचे असेल तर `साला!' म्हणतात." हे ऎकून त्या भाषेचा यथार्थ शब्दयोजना-सामर्थ्यावर माझे एकदम प्रेम बसले. `ट्रिंग ट्रिंग' ऎसा `खोटा नंबर' फिरल्यावर `हलो हलो' ला `साला' ह्यासारखे समर्पक उत्तरे दुसरे मला तरी सुचत नाही! हे दु:ख टेलिफोनशी घनिष्ठ संबंध असणाऱ्यांनाच कळावे. रात्री बाराएकच्या सुमारास गाढ निद्रेतून जागे करणारी ती क्षुद्र घंटिका! `हॅलो' म्हणून आपण विचारतो आणि पलिकडून कुणीतरी `केम सुखमडल सेठ----' अशी प्रस्तावना करून `न्यूयोर्क कोटन' बद्दल अगम्य भाषेत बोलू लागतो. अशा वेळी `साला!' हा मलाय शब्द काय चपखल बसेल! वा! जगात असे आंतरराष्ट्रीय सुबक शब्द जमवून भाषा बनवली पाहिजे. होय आणि नाही यांना मात्र मलाय `आडा' आणि `तिडा' तितकेसे चांगले वाटत नाहीत. आणि एकदा मला चहात दुध हवे होते असे कुजबुजल्यावर आमच्या मित्राच्या पत्नीने मोलकरणीला `बाबा लागी सुसू' म्हटल्यावर मी दचकलो! पण मलाय भाषेत दुधाला `सुसू' म्हणतात. `बाबा' म्हणजे आण आणि `लागी' म्हणजे काय कोण जाणे!


बाकी ही भाषा फार सोपी आहे. प्रत्ययबित्यय भानगडी कमी! शब्द एकमेकांसमोर ठेवायचे. मलाय भाषेचेचे अधिक सुंदर स्वरुप म्हणजे `बहासा इंडोनेशिया'. संस्कृत शब्दांचा यात खूप भरणा आहे. इंडोनेशिया तर ठायीठायी संस्कृतचे ठसे आहेत. मलायात आणि इंडोनेशियात मुख्य धर्म इस्लाम, पण ह्या इंडोनेशियातल्या इस्लामी बंधूंवर प्राचीन भारतीय संस्कृतीचा छाप टिकून आहे. अर्थात काही शब्द भलतेच घोटाळ्यात टाकतात. मलायमध्ये मोठ्या बहिणीला `काका' म्हणतात. पण `काकी' म्हणजे पाय! डुकराला `बाबी' म्हणतात! छातीला `दादा' म्हणतात, पण पाठीला वहिनी म्हणत नाहीत! डोळ्याला `माता' पण `मातामाता' असे दोनदा म्हटले की पोलीस! आजीला `नेने' पण आजोबा लेले नव्हेत! अनेकवचने करणे फार सोपे. तोच शब्द दोनदा उच्चारायचा! `मुका' म्हणजे चेहरा आणि `मुकामुका' म्हणजे चेहरे. चेहरा आणि मुका यांचे अद्वैत मानणारे हे लोक थोरच. पण खरा मुका घेण्याला मात्र `चिओंब' म्हणून चुंबण्याच्या जवळ जातात. छातीला `दादा' म्हणणारे बहाद्दर हदयाला `चिंता' म्हणतात आणि प्रेयसीला चिंतातुर न म्हणता `चिंता मानिस' म्हणतात. `मानीस' म्हणजे गोड! आणि `पडास' म्हणजे तिखट! बाकी मलाय स्त्रिया क्वचीत मानिस चिंता करायला लावतातही. एखाद्या सुस्तनीची दादागिरी कां चालते हे मलायात गेल्यावर अधिक कळते.

मंगलवार, 22 जुलाई 2008

ती गेली .......

आज सकाळी सकाळी शेजारच्या काकू घरी आल्या "ती म्हातारी मेली ग सुटली बिचारी " अस ती बोलताच समजल की ही नवसो म्हातारी आहे " नवसो सावल "

सोमवार, 14 जुलाई 2008

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी अस सार्थ पणे म्हंटल गेलय मात्र जिवंतपणी आईला नरक यातना भोगायला लावणारे महाभाग आहेत अस म्हंटल्यास अतिशोयोक्ती ठरू नये जन्म दाती आईला चक्क संङासात सोडून देणार्या मुलाच्या पराक्रमाची सुन्न करणारी घटना घडली आहे पणजित






दोन धडधाकट पुत्र असतानाही चक्क सुलभ शौचालायत आजारी अवस्थेत एका महिन्याहून अधिक काळ सोडून दिलेल्या नवसो सावल वय वर्ष ७५ हिची ही करुण कहाणीमूल लहान असताना तिच्या नवर्याचा मृत्यु झाला कबाड़ कष्ट करून आपल्या चार मुलाना मोठ केल दारोदारी धुनी घरकाम करून मुलाना काहीच कमी पडू दिल नाही मात्र आता म्हातारपणामूळे पूर्वी सारखा काम कारण तिच्यात शक्य होत नव्हत त्यातच आजारी पडू लग्ल्यान काम मिळणही बंद झाल


तिन करते सवरते मुलगे त्यातील एकाच निधन झाल उर्वरित दोघामधिल लग्न होउन एक मुलगी तर दूसरा काही काम धंदा नसलेला त्यातच त्याला दारुच व्यसन तिन महिन्या पूर्वी नवसो गंभीर आजारी पडली तिला GMC मद्धे दाखल करण्यात आल हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तिच्या मोठ्या मुलाने आपली आई सावत्र असल्याचा सांगत तिला घरात घेण्यास नकार दिला शेजार्यानी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने त्याना शिविगाळ देण्यास सुरवात केलि काही दिवस नवसो व् तिचा धाकटा मुलगा घरा बाहेरच झोपायचे शेजारची लोक तिला दोन टाइम च जेवण देते होते मात्र पावसाला सुरवात झाल्यान त्याना बाहेर राहण शक्य नव्हत म्हणुन धाकट्या मुलान तिला सुलभ शोचालायत ठेवल तिथे तिची प्रकृति आनखिन खालावली ती मरणार म्हणुन तिथल्या लोकानी नगरसेवाकाला कळवल त्याने तिला पुन्हा GMC मद्धे नेल मात्र तिथे तिला डॉक्टर नसल्याचा कारण देत घेतल नाही शेवटी नगर सेवक रुद्रेश छोडंकर यान तिला प्राइवेट हॉस्पिटल मद्धे दाखल केल नवसो हॉस्पिटल मधे उपचार घेत असून तिची प्रकृति गंभीर आहे


आजची तरुण पीढी जास्त practical आहेत ? आई बाबांचा त्याना ओज वाटत ? की माणसाच्या भावना नष्ट होतायत ?

शनिवार, 5 जुलाई 2008

माझ बालपण

शाळेतील आठवणी शेयर करायला कुणाला बर आवडणार नाही, आणि ब्लॉग मुळे तर ह्या आठवणी अनेकान पर्यन्त पोचणार याचा मला खुप आनंद वाटतो त्या आठवणी संगण्या पूर्वी माझ्या बद्दल एका वाक्यात संगते "tom boy "
शाळेत कधी वेळेवर पोह्चलेच नाही त्या मुळे पहिल्या तासाला बाई नेहमी वर्गा बाहेर ठेवायच्या टाइम पास बरंया पैकी व्हायचा मात्र बाई एवड्यावर कुठे थम्बताय्त bonus म्हणुन मला नेहमी एक पान शुद्लेखन असायचा जाम वैताग यायचा ,सुरवातीला मी मोठ्या मोठ्या अक्षरात लिह्याचे म्हणजे एकदा ते पान लिहून लगेच संपाव, हळु हळु अक्षर मोठी होत गेली तस् तशी वहीची पान पण वाढत गेली नतर हे कधी थाबलठाउक नाही.... गृंहपाठ !!! स्वाभाविक आहे वर्गात व्ह्याचा किवा विश्रांति वेळी मात्र एकदा ह्या गोष्टी साठी प्रसाद मिळाला होता , क्लास मधे पुंडलिक जो होता शिकायला तसा हुशार नव्हता गृहपाट देखिल करत नव्हता वर्गात मस्ती बापरे त्याचा ह्या गोष्टींशी ३६ चा आकडा होता आणि सगळ्यात वाइट गोष्ट म्हणजे त्याला खर बोलयाची सवय होती वर्गात कुणी मस्ती केली कुणी कॉपी केलि कुणी क्लास मधे गुर्हपाट केला की हा आपण आदर्ष विद्यार्थी असल्याच भासवत बाई ना टेलीप्रोम्पटर सारखा सगळ सांगायचा त्यात त्याच्या हेतु मात्र कोणताच नसायचा पण त्याच्या चेहॅयावर गरुड़ जेप घेतल्या प्रमाणे प्रसन्नता असायची एकदा गणिताचा गृहपाट मी करायला विसरले आणि तो नेहमी प्रमाणे करून आलाच नव्हता त्या दिवशी तो शेवट च्या बाकावर तर मी शेवटून दुस्र्या बाकावर होते बाई आमच्या पर्यन्त पोचणार तो पर्यन्त गणित सोड्वुन झाल असत पण बाई ने बजावल होत की पेनसिल कुणीही हातात घ्यायची नाही तरीही मी पूर्ण केला असता चुकल अस्त गणित पण गृहपाट केला नाही म्हणुन मार तरी पडला नस्ता मात्र आमच्या नशिबाच्या आई ला घोड़ा लागला त्या पुंडलिका मुळे मी त्याच्या समोर ऑफर टेवली त्याला सांगितला की गप्प रहा मी गणित २ मिनिटात सोड्व्ते तू फक्त गप्प रहा आणि कॉपी कर पण नाही ह्याच्या अंगात जणू छत्रपति संचाराले त्याने तोंड उघडल्या बरोबर बाई आल्या व आधी त्याच्या कानाखाली तुतारी वाजवली आणि नंतर मझां वर्गा अभिषेक झाला
भांड्ण नेहमीच व्ह्याची मला अनेक जण मोट्या म्हणायचे (कोकणित मोट्या म्हणजे जाडी) अमेय हा नालायक मुलगा नेहमी मला छळायचा आणि त्याची छळायची स्टाइल विचित्र होती तो मकडा सारखे चेहरयाचे हावभाव करायचा आणि ते हाव भाव बघून मला इतका राग याचा की विचारू नका शिवाय नेहमी मोटया म्हणायचा एक दिवस मला मोटया म्हटल्यावर मी ह्याला शिवि दिली त्यानेही शिव्या दयाला सुरवात केलि मला भयंकर राग आला मी जाड्जुड असल्यान त्या संगाड्याला धक्का दिल्या बरोबर तो बाकावर जाऊन आदळला साल्याला लागल नाही पण मी धक्का दिला म्हणुन तो फड्फ़ड़त बाई कड़े गेला बाई आल्या आणि दोघांन समोर दोन option ठेवले १) दोघानी बागेत झाडाना पाणी घालायच २ ) दोघानी पट्टी चा मार खायचा , माज्याही मानत तोच विचार आला जो त्याच्या आला आम्ही दोघानी बागेत पाणी घालायच ठरवल त्यानुसार आम्ही बागेत गेलो पण नंतर कोणास ठाउक माज्या मनात काय आल मला बागेत पाणी घालण योग्य वाटला नाही prestige चा प्रश्न अस काही तरी माज्या मनात आल मी पाइप तिथेच टाकला व बाई कड़े गेले बोलले की मला मारा बाई ने सुद्धा वेळ न घालवता एकदाच जोरात मारल किर्र असा आवाज माज्या कनापर्यंत पोचताच डोळ्यातुन अश्रु आले पण मनात काही तरी वेगळ केल्या सारखा वाटल आणि तिळकाच आदर्ष डोळ्या समोर आला hehehehe
दरवर्षी वर्ग बदलत गेली मस्ती सुद्धा वाढत गेली पण जेव्हा आठवित पोचले तेव्हा मी मुलगी असल्याचा लक्षात आल ८०% हुन जास्त माझया क्लास मधल्या मुलाना true love झाल अर्थात मला सुद्धा झाल मला जो मुलगा आवडला तो ९ वीत होता सिद्धेश चौहान पण तो मला धुप घालत नव्हता कारण मी जाड जुड़ होते आणि त्यात दिसायला सुद्धा बाव् ळट होते सिद्धेश काय कोणत्याच मुलानी मला हिरवा कंदील दाखवला नस्ता जाउदे तर सिद्धेश नावाचा मुलगा मला आवडायचा रोज त्याला इंटरवल वेळी पाहायच स्कूल सुटल्यावर पाहायच असेम्बली मधे त्याला बतिशी दाखवायची अस एक वर्ष चालल जेव्हा तो १० वीत आणि मी ९ वीत पोचले तेव्हा मी ठरवल की ह्याला जाउन विचाराव की मी सुद्धा तुला आवडते की नाही कारण त्याच शेवटच वर्ष होत सेंड ऑफ़ झाल्या नंतर तो मला कधीच दीशणार नव्हता त्याला विचारन्याचा योग स्पोर्ट्स डे दिवशी आला मी त्याला prapose करायचा ठरवल त्यासाठी मी एक छोटस love letter लिहिल एका ओलिच DO U love ME पण त्याने ती चिठ्ठी हातातच घेतली नाही solid रडले मी घरी जाताना मला हिन्दी सिनेमाची सगळी sad गाणी आठवली ८, १५ दिवस स्वताला बराच त्रास दिला आणि फोलो उप म्हणुन मी ३ विषयात नापास नंतर मात्र प्रेमाच भुत उतरला मी solid हादरले होते तिन रेड लाइन बघून माझया रिजल्ट वर नंतर काही दिवसात मी माझया मूळ आयुष्यात पधार्पण केल आणि २००२ मद्धे माजी ssc झाली hssc च्या आठवणी दुसर्या पोस्ट मधे to be cont ------